नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9833326393 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें

Recent news

April 16, 2026

Right Media Samachar

Hindi News, हिन्दी समाचार, हिंदी न्यूज़, Latest Hindi News, Breaking News, Right Media Samachar

मुंबईतील टाटा हॉस्पिटल समोर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कॅन्सर पीडित रुग्ण नातेवाईकांना इंडिया मीडिया लिंक व फ्लोरा फाउन्डेशन द्वारा ब्लॅंकेट वाटप….

1 min read



मुंबईचे माझी उपमहापौर बाबूभाई भवानजी, के रवी दादा यांचे मानले आभार….

मुंबई, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला इंडिया मिडीया लिंक अँन्ड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टाटा , kem हॉस्पिटल,मध्ये देशभरातून उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्ण्यांच्या नातेवाईकांना थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी हजारो ब्लॅंकेट्स, मिठाई, तिरंगा ध्वज देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबईचे माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी आणि बॉलीवूडचे नामांकित व ज्येष्ठ पत्रकार उद्योजक के रवी दादा यांच्या उपस्थितीमध्ये ब्लॅंकेट वाटप करण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे तोंड भरून कौतुक करीत आभार मानले.
टाटा आणि केईएम रुग्णालयात उपचार करण्यासाठी देशभरातून रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात, परंतु थंडीच्या कडाक्यामध्ये त्यांना रस्त्यावरच राहण्याची नामुष्की ओढवते, अशा पिडीतांना सहकार्य मदतीचा हात मिळावा यासाठी इंडिया मीडिया लिंक इव्हेंट मॅनेजमेंटचे के. राहुल, फ्लोरा फाउन्डेशन चे अध्यक्ष अरुण सबनीस यांच्या हस्ते यावर्षीही ब्लॅंकेट वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून त्यांनी पीडितांना दिलासा दिल्याचे डॉ. रत्नाकर आहिरे यांनी सांगितले. हा उपक्रम आजचा नसून गेले पंधरा ते सोळा वर्ष हा उपक्रम राबवून सरकारचे या पिडीत आणि रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष वेधण्याचा हा प्रमुख उद्देश असून मुंबईमध्ये ही या पिडीतांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करणारे नातेवाईक आहेत ही भावना मुंबईकरांमध्ये रुजवण्यात व त्या प्रकारे संदेश देण्याचा आम्ही दरवर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला जाणीव करून देतो, अशी प्रतिक्रिया उद्योजक समाजसेवी के रवी दादा यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. मुंबईचे माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी यांनी ध्वजारोहण करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू, असे उपस्थितांना आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा करणारे शिवसैनिक देवदत्ता बाळा भट यांनीही सर्वांना आकर्षित केले. प्रकाश दुपारगडे, शरद रणपिसे, संतोष धाळवे यांनीही मान्यवरांची आभार व्यक्त केले. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भावना सरकारपर्यंत पोचविण्याचा हा उपक्रम सदैव्य सुरूच राहील, असे आश्वासन फ्लोरा फाउन्डेशन व इंडिया मीडिया लिंक इव्हेंट मॅनेजमेंटचे के राहुल , व सबनीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon