संजय दत्त ला मराठीचे धडे देणार – अभिजित राणे

मुंबई प्रतिनिधी राज्य सरकारने रिक्षाचालकांना मराठी शिकण्याचे आवाहनाला भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी सिनेस्टार संजय दत्त यांना मराठी शिकण्यासाठी निमंत्रण दिले आहे.
गोरेगाव पॅश्चिम येथीक बांगूर नगर येथे अय्यपा मंदिराच्या प्रांगणात महाराष्ट्र शासन परिवहन विभाग राज्य मराठी विकास संस्था कोकण मराठी साहित्य परिषद व धडक कामगार युनियन महासंघ यांच्या वतीने अमराठी भाषिक रिक्षा चालक यांना मराठी शिकवणी वर्ग प्रशस्ती पत्र वितरण सोहळा पार पडला या वेळी सुमारे 5000 रिक्षा चालकाना प्रशास्ती पत्र वाटण्यात आले
भाजपा कामगार आघाडीचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघ चे महासचिव अभिजित राणे यांनी आपल्या भाषणात सिनेस्टार संजय दत्त यांना मराठी शिकण्यासाठी आपण घेत असलेल्या शिकवणीत प्रवेश घेण्याचे निमंत्रण देत असल्याचे सांगितले.
नुकताच झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात सिनेस्टार संजय दत्त यांनी मराठी भाषा येत नसल्याचे परिवहन मंत्री यांच्या उपस्थितीत कबूल केले होते
कार्यक्रमास
आचार्य पवन त्रिपाठी, सरचिटणीस मुंबई, भाजपा
विनोद शेलार, सरचिटणीस मुंबई, भाजपा, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, धडक कामगार युनियन व भाजपा कामगार आघाडी मुंबई चे पदाधिकारी
