श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांसह मुसळधार पावसात शेकडो डॉक्टर भक्तिभावाने नाचत-गात सहभागी झाला. यावेळी मुंबईचे माजी उपमहापौर बाबुभाई भवानजीही प्रमुख पहुने मनुन उपस्थित होते.*
1 min read
*मुंबई दादर येथील श्री स्वामी समर्थ मठापासून पंढरपूरपर्यंत निघालेल्या या पवित्र यात्रेत शेकडो डॉक्टर सहभागी झाले आणि भगवान श्री विठ्ठलाच्या मंदिरात पूजा-अर्चना केली. या यात्रेत सुमारे 400 डॉक्टरांनी वारकरी व गावकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक ठिकानि हेल्थ चैकप कैंप चा आयोजन केला आहे*. *दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेतर्फे मुंबई ते पंढरपूर या मार्गावरील विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे, प्रसाद, चहा, पिण्याचे पाणी आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.*
*या सर्व व्यवस्थेची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक मोहिते, महामंत्री डॉ. शंकर सावंत तसेच इतर पदाधिकारी आणि सदस्य यांनी श्रद्धाभावाने पार पाडली आहे. भगवान श्री विठ्ठलाच्या वारकऱ्यांची सेवा करून ते पुण्यसंचय करत आहेत. या सेवा कार्यात मोठ्या संख्येने युवा डॉक्टर आणि युवा महिला डॉक्टर भक्तिभावाने सहभागी झाल्याचे बाबुभाई भवानजी यांनी आपल्या प्रवचनात मनाले, त्यानी भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की, सर्व सेवाधारकांच्या अंतःकरणात प्रज्वलित झालेला सेवेचा दीप कायम तेवत राहो. ही पवित्र सेवा आणि यात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंड सुरू राहो, अशी त्यांनी प्रार्थना केली, आणि सर्व वारकरी व भक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.*


