नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 9833326393 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें

Recent news

April 16, 2026

Right Media Samachar

Hindi News, हिन्दी समाचार, हिंदी न्यूज़, Latest Hindi News, Breaking News, Right Media Samachar

बृहन्मुंबई महानगरपालिका*

1 min read



*जनसंपर्क विभाग*

दिनांक २७ मार्च २०२६

दर्जेदार आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस

शीव (सायन) रुग्णालयाची क्षमता दुप्पट झाल्याने दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार

एक शहर एक आरोग्य संकल्पनेअंतर्गत रुग्णालयामध्ये सहज, सुलभ आणि समन्वित सेवा देणार – महापौर श्रीमती रितू तावडे*

प्रत्येक मुंबईकराला आगामी कालावधीत दर्जेदार आरोग्य सेवासुविधा मिळावी, यासाठी बृहन्मुंवबई महानगरपालिका व राज्य शासन एकत्रितपणे काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. मोफत आणि दर्जेदार आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून एकत्रितपणे प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या पुनर्विकास टप्पा २ अंतर्गत इमारत भूमिपूजन निमित्ताने शीव (सायन) येथे आयोजित कार्यक्रमात आज (दिनांक २७ मार्च २०२७) ते बोलत होते. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून नोव्हेंबर २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, कॅप्टन आर. तमील सेल्वन, सुनिल शिंदे, प्रसाद लाड, महापौर श्रीमती रितू तावडे, उपमहापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष श्रीमती संगीता शर्मा, महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती मीनल तुर्डे, आरोग्य समितीचे अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, सर्वपक्षीय नगरसेवक, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. विपिन शर्मा, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देव शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

 मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईच्या विविध भागातून तसेच देशाच्या कानाकोपऱयातून आणि परदेशातून येणाऱया रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होण्यासाठी शीव येथील नव्या रुग्णालयाच्या माध्यमातून मदत होणार आहे. आरोग्य सुविधा मोफत आणि दर्जेदार यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. आधुनिक आणि नव्या विस्तारित इमारतीमुळे रुग्णक्षय्या क्षमता दुप्पट होणार आहे. रुग्णालयाच्या चार इमारतींच्या माध्यमातून एकूण ३ हजार २८६ रूग्णशय्या विविध आरोग्य सुविधे अंतर्गत उपलब्ध होणार आहेत. अत्याधुनिक यंत्रणेसह विविध सुविधांनी युक्त अशा रुग्णालयाचे बांधकाम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता रुग्णालयाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱया कर्करोग उपचारासाठीच्या इमारतीमुळे टाटा कर्करोग रुग्णालयावर येणार ताण कमी होण्यासाठी मदत होईल. राज्य तसेच केंद्र शासनाच्या आरोग्याच्या विविध योजनांचा फायदा हा सर्वसामान्य रुग्णांसाठी देण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक व्यक्तीला किमान ५ लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध होतील, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

 महापौर श्रीमती रितू तावडे म्हणाल्या की, शीव रुग्णालयाच्या ऐतिहासिक भूमीवर उभे असताना आपण केवळ एका इमारतीचा पुनर्विकास शुभारंभ करत नाही, तर मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेला एका नव्या युगात घेऊन जाण्याचा संकल्प या ठिकाणी करत आहोत. ‘एक शहर एक आरोग्य व्यवस्था’ (One City, One Health System) या संकल्पनेद्वारे मुंबईतील प्रत्येक रुग्णाला कोणत्याही महानगरपालिका रुग्णालयामध्ये सहज, सुलभ आणि समन्वित सेवा मिळेल, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. रुग्णाला पुन्हा-पुन्हा तपासण्या करू लागू नयेत, रुग्णाला वेळेवरती या ठिकाणी सेवा मिळणे, स्पष्ट माहिती मिळणे, सन्मानाने वागणूक दिली जाते, हे सुद्धा गुणवत्ता मोजण्याचे एक निकष आहे आणि त्यामुळेच महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेत संवेदनशीलता आणि संवाद यावरती विशेष भर या ठिकाणी दिला जाईल, असेही महापौर श्रीमती रितू तावडे यावेळी म्हणाल्या.

शीव तसेच धारावी, चेंबूर, वडाळा याठिकाणांसह मुंबई आणि देशाच्या विविध कानाकोपऱयातून येणाऱया रुग्णांसाठी नव्या रुग्णालयामुळे अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे. सध्या उपचारासाठी रुग्णालय व्यवस्थेवर येणारा ताण कमी होण्यासाठी नव्या इमारतीच्या क्षमता विकासामुळे फायदा होईल, असा विश्वास स्थानिक आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याप्रसंगी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे ‘ई-रुग्णवाहिके’चेही लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्मिता गवाणकर यांनी केले.

स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे.

Donate Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon